अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग होणार? महाअधिवेशनाआधी शर्मिला ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग होणार? महाअधिवेशनाआधी शर्मिला ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे कोणती राजकीय भूमिका स्पष्ट करणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणती राजकीय भूमिका स्पष्ट करणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सक्रीय राजकारणात एण्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. अधिवेशनाआधी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी याबाबत बोलण्यास मात्र नकार दिला आहे. 'अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार का?' असा प्रश्न विचारल्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, 'माहीत नाही. पण झालंच तर आनंद होईल. अधिवेशनाबाबत मोठा सस्पेन्स आहे.'

दरम्यान, राज ठाकरे हे महाअधिवेशनात भाषण करतील. त्यामुळे राज ठाकरे हे नवीन पक्षाची काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहणार असल्याची माहिती आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरला अधिवेशनासाठी 20 ते 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

'बाळासाहेब ठाकरे लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील', जयंतीनिमित्त PM मोदींकडून अभिवादन

मनसेचे महाधिवेशना निमित्त मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून बॅनरबाजी केली गेली आहे. त्या बॅनरवरुन मनसेचा पूर्वीचा झेंडा गायब आहे. नव्या झेंड्याचे स्वरुप कसे असणार हे जरी अजून स्पष्ट नसले तरी नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. यावरून राज ठाकरे हे हिंदुत्त्वाची भूमिका घेणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

First published: January 23, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या