ED चौकशी होणार? राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

ED चौकशी होणार? राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

काही दिवसांत ईडीकडून राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडीच्या निशाण्यावर असून काही दिवसांत ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ईडीबाबत भाष्य केलं आहे.

'मला कोणीही हॅलो करण्यासाठी आलेलं नाही. मी या सगळ्याबद्दल फक्त तुमच्याकडून बातम्या ऐकत आहे,' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना अद्यापतरी समन्स बजावण्यात आलं नसल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)समन्स बजावण्यात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांत ईडीकडून राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात येईल, अशा आशयाचं वृत्त 'फ्री प्रेस'ने दिलं होतं. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे अडचणीत येणार का, याची चर्चा सुरू झाली.

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते ईडीच्या टार्गेटवर आहेत. अशातच राज ठाकरे यांचंही नाव या यादीत आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. 'कोहिनूर मिल 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरेंचा सहभाग असून याच कारणाने ते ईडीच्या निशाण्यावर आहेत,' असं फ्री प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं होतं.

हप्ता दिला नाही म्हणून हॉटेल मालकाला मारहाण, पोलिसाच्या दादागिरीचा पाहा CCTV

Published by: Akshay Shitole
First published: August 2, 2019, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading