मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सेवक छत्रपतींची सेवा करण्यास निघाला', बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

'सेवक छत्रपतींची सेवा करण्यास निघाला', बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. पुरंदरे यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे भावूक झाले आहेत.

राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. पुरंदरे यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे भावूक झाले आहेत.

राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. पुरंदरे यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे भावूक झाले आहेत.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 15 नोव्हेंबर: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे पुण्यात (Pune) आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. पुरंदरे यांच्या अंतिम दर्शनासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. पुरंदरे यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे भावूक झाले आहेत. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. आज राज ठाकरे मुंबईहून पुण्यात येऊन बाबासाहेबांचे निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. हेही वाचा- IND vs NZ: जयपूरमध्ये होणारी पहिली T20 मॅच संकटात, दोन्ही टीमसमोर मोठा पेच  राज ठाकरे यांनी ट्विटरवरूनही श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते. बाबासाहेब मला नेहमी सांगत, "महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची!" शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. अशा भावनिक संदेश लिहित राज ठाकरेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली असंही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. हेही वाचा- VIDEO: एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं; आईजवळ खेळणाऱ्या चिमुकल्याची बिबट्यानं केली भयावह अवस्था  काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील.
First published:

Tags: Raj Thackeray (Politician)

पुढील बातम्या