मुंबई, 23 जानेवारी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरेंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
'27 वर्षांत पहिल्यांदाच मी जाहीर व्यासपीठावर बोलत आहे. तुम्ही सर्वांनी आज आणि याआधीही मला जे प्रेम दिलं आहे, ते भविष्यातही द्याल, यासाठी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो,' असं म्हणत अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तसंच पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी शिक्षण ठरावही मांडला आहे.अमित ठाकरे यांनी आज महाअधिवेशनामध्ये पहिल्यांदा ठराव मांडला आहे. गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होण्याची अवश्यकता आहे. लहान मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत तातडीनं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत अमित ठाकरे यांनी ठराव मांडला आहे. महाराष्ट्राचं राजकारण असो किंवा भारताचं इथे नव्या दमाचे चेहरे तसे फार कमी दिसतात. मात्र याला अपवाद ठाकरे कुटुंब. आपल्या हँडसम आणि राऊडी लूकमुळे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे फार प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच आता राजकारणात सक्रिय झाल्यामुळे आदित्य ठाकरेंना टफ फाईट देणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-राज'पुत्राची राजकारणात एण्ट्री! अमित ठाकरेंबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील
हेही वाचा-‘रंगील’ सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स, निवडणूक जिंकताच केला हवेत गोळीबार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit thackaray, MNS, Mumbai news, Raj thacarey