राज ठाकरे दिल्लीत, EVMच्या वादावर निवडणूक आयुक्तांना भेटणार

राज ठाकरे दिल्लीत, EVMच्या वादावर निवडणूक आयुक्तांना भेटणार

कुठल्या प्रश्नावर दिल्लीत जाऊन गाठीभेटी घेण्याची राज ठाकरे यांची ही पहिलीच वेळ आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 7 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (8जुलै) मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेणार आहेत. EVM मशिन्सच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्यामुद्यावर राज हे आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. मनसेसहीत अनेक राजकीय पक्षांनी EVMवर संशय व्यक्त केला होता. EVM हॅक होऊ शकतं त्यामुळे यापुढच्या निवडणुका या EVM मशिन्सव्दारेच घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. राज ठाकरे आजच दिल्लीत दाखल झालेत.

राज ठाकरे यांनी याआधीही अनेकदा EVMच्या वापरासंदर्भात आक्षेप घेतले होते. लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी राज यांनी महाराष्ट्रभर सभा घेऊन वादळ निर्माण केलं होतं. त्यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित झाला नाही. लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला होता.

'नितेश राणेंनी चिखल फेकला मी तर अधिकाऱ्यांचे डोकेच फोडेन'

राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत आपलं राजकारण हे महाराष्ट्रापुरतच मर्यादीत ठेवलं होतं. दिल्लीत ते कधी फारसे गेले नाहीत.  कुठल्या प्रश्नावर दिल्लीत जाऊन गाठीभेटी घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. दिल्लीत संसदेचं अधिवेशनही सुरू आहे, त्यामुळे राज हे काही नेत्यांच्या भेटीगाठीही घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बॅलेट पेपरसाठी सुप्रीम कोर्टात याचिका, तत्काळ सुनावणीस नकार

EVM द्वारे निवडणुका घेण्याबाबत दिवसेंदिवस होणारा विरोध वाढताना दिसत आहे. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. निवडणुका बॅलेट पेपरने घेण्यासंदर्भातील याचिका मनोहर शर्मा यांनी दाखल केली होती. यावर तात्काळ सुनावणीची मागणी देखील मनोहर शर्मा यांनी केली होती. पण, याचिकेवर तात्काळ सुनावणीस मात्र सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यापूर्वी देखील EVMबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. सत्ताधारी भाजप EVM मशिन हॅक करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

Bigg Boss Marathi 2- अन् माधवच्या चाहत्याने या स्पर्धकाविरुद्ध केली चुगली

EVMबाबत आरोप

लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत EVM आणि VVPATमधील 50 टक्के मतांच्या मोजणीची मागणी केली होती. तर, निकालानंतर नारायण राणे, शरद पवार, अजित पवार, तसंच काँग्रेसच्या काही नेत्यांनी EVMमध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता.

काही ठिकाणी ईव्हीएम हॉटेलमध्ये देखील आढळून आले होते. त्याआधारे देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. शिवाय, EVM बाबत यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या आहेत.

First published: July 7, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading