अमित ठाकरेंनी मुलाचा फोटो केला शेअर
काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो फेसबुकवर शेअर केला. अमित-मिताली (Amit Thackeray and Mitali Thackeray Blessed with Baby Boy) यांना पूत्ररत्न झाले आहे. यामुळे आता राज ठाकरे यांच्यावर 'आजोबा' अशी नवी जबाबदारी असणार आहे. शिवतीर्थावरावर नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुंबईतच राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, कारण मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 साली लग्न झाले होते. त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. या लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. आता अमित ठाकरे यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांना आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray (Politician)