मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साहेबांचे खरे वारसदार...; शिवसेनेला डिवचण्यासाठी ठाण्यात मनसेची पोस्टरबाजी

साहेबांचे खरे वारसदार...; शिवसेनेला डिवचण्यासाठी ठाण्यात मनसेची पोस्टरबाजी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतल्यानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतल्यानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतल्यानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले आहे.

ठाणे, 25 जानेवारी :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतल्यानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले आहे. ठाण्यात “साहेबांचे खरे वारसदार हिंदूह्रदयसम्राट राज ठाकरे” असे बॅनर लावण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हे बॅनर लावले असून या बॅनरमुळे ठाण्यात राजकीय वातावरण तापलं आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मनसेनं घेतलेल्या महाअधिवेशनात मनसेनं फक्त झेंडा बदलला नाही तर मनसेनं आपली राजकीय भूमिका बदलून हिंदुत्त्व हीच आता मनसेची भूमिका असणार हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतरच शिवसेना आणि मनसेमध्ये आता राजकीय वातावरण आणखी तापेल, असं बोललं जात असताना ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी “साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृदय सम्राट राज ठाकरे” या प्रकारचे बॅनर लावल्याने शिवसेना विरुद्ध मनसे असा थेट सामना रंगणार हे स्पष्ट झालं आहे.

या वर्षी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली तसंच ठाणे जिल्ह्यातील  विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. ज्यापैकी बहुतांश ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मनसेकडून शिवसेनेला थेट आव्हान देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापायी जे केलंय. त्यामुळे हिंदूंचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असून त्यांनी अयोध्येला जावं किंवा राम सेतू बांधावा हिंदू जनता आता राज ठाकरे यांच्या सोबत आहे आणि आता साहेबांचे खरे वारसदार हे राज ठाकरेच आहे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

'सामना'तून शिवसेनेची मनसेवर सडकून टीका

मनसेप्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत,' असं म्हणत शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.

काय आहे सामनाचा अग्रलेख?

"देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे. दुसरी गंमत अशी की, त्यासाठी एक नव्हे, दोन दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे. राज ठाकरे व त्यांच्या 14 वर्षे जुन्या पक्षाने मराठी हा मुद्दा घेऊन आधी पक्षाची स्थापना केली, पण आता त्यांचा पक्ष हिंदुत्ववादाकडे वळला असे एकंदरीत दिसते. आडवळणाने वळत आहे असे म्हणणे सोयीचे ठरेल. शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर भरपूर काम करून ठेवले आहे. त्यामुळे मराठी मनास साद घालून हाती काहीच लागले नाही. लागण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जनता पक्षाला हवे आहे म्हणून राज ठाकरे यांनी ‘हिंदू बांधव, भगिनी, मातांनो…’ अशी साद घातली असा टीकेचा सूर आहे. येथेही हाती काही लागेल याची शक्यता कमीच आहे. शिवसेनेने प्रखर हिंदुत्वाच्या विषयावरही देशभरात मोठे जागरण व काम केले आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा भगवा रंग कधीच सोडला नाही. हा रंग तसाच राहील. त्यामुळे दोन झेंडे निर्माण करूनही राज यांच्या झेंड्यास वैचारिक पाठबळाचा दांडा मिळण्याची शक्यता दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यास रंग बदलणे कसे म्हणाल? त्याबाबत आक्षेप कमी व पोटदुखी जास्त. भाजप किंवा इतरांनी अगदी मेहबुबापासून इतर कुणाशीही निकाह लावला तरी चालतो, पण ही राजकीय व्यवस्था इतर कोणी केली की ते पाप ठरते. आम्ही सरकार स्थापन केले हे पाप नसून समाजकार्य आहे. सरकारची ध्येय, धोरणे स्पष्ट आहेत. सरकार राज्यघटनेच्या कलमांनुसार चालवले जाईल व अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शेतकरी, कष्टकऱ्यांचे कल्याण, सुरक्षा अशा समान नागरी कार्यक्रमावर पुढे जाईल.

First published:

Tags: MNS, Mumbai, Raj Thackery