Home /News /maharashtra /

मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, भाजप नेत्याचा पोलिस आयुक्तांना फोन

मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, भाजप नेत्याचा पोलिस आयुक्तांना फोन

हत्येला 24 तास उलटून गेली तरी ठाणे पोलिसांना जमील शेख यांच्या मारेकऱ्यांचा काहीच सुगावा लागला नाही.

ठाणे, 24 नोव्हेंबर: ठाण्यातील राबोडीतील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Sheikh) यांची काल, सोमवारी गोळ्या झाडून हत्या (Murder)करण्यात आली. एका महिन्यात 2 पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रवीण दरेकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून गुन्ह्यांतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. हेही वाचा...मुंबईसाठी पुढील 3 आठवडे महत्त्वाचे, लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर आयुक्त म्हणाले.... ठाण्यातील राबोडी येथे मनसैनिक जमील शेख हत्येप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी फोन वरुन चर्चा केली. हत्येला 24 तास उलटून गेली तरी ठाणे पोलिसांना जमील शेख यांच्या मारेकऱ्यांचा काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे ठाणे पोलिस नेमकं करतायेत काय? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोनवरुन विचारला आहे. जमील शेख यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी 6 विशेष तपास पथक तयार केले असून दुचाकीवरुन आलेले मारकेरी हे सराईत गुन्हेगार होते. त्यांच्या गाडीचा नंबर देखील बनावट होता. पण ठाणे पोलिस लवकरच जमील शेख यांच्या मारेकऱ्यांना पकडतील, असा विश्वास ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे व्यक्त केला आहे. डोक्यात झाडली गोळी... ठाण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना काल घडली. डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. जमील शेख यांची हत्या का करण्यात आली असावी, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र, पोलीस अजूनही हत्येला दुजोरा देत नसून, वैद्यकीय अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, या घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, जमीलच्या हत्येनंतर राबोडी भागात तणावाचे वातावरण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हेही वाचा...लग्न झालेल्या प्रेयसीला भेटायला बोलवून चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, पुण्यातील थरार दरम्यान, मागील महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी अंबरनाथमध्ये मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली होती. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जैनम रेसिडेन्सी परिसरात पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हल्ल्याच्यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Crime news, Maharashtra police, Pravin darekar, Thane, Thane crime

पुढील बातम्या