मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ही लढाई आहे.. मनसेच्या महामोर्चाची जोरदार तयारी, पाहा पहिला टिझर..

ही लढाई आहे.. मनसेच्या महामोर्चाची जोरदार तयारी, पाहा पहिला टिझर..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 5 फेब्रुवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे येत्या 9 फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढणार आहे. मनसे या मोर्चासाठी जोरदार तयारी करत आहे. महामोर्चात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करणारे होर्डिंग्स मुंबईत झळकू लागले आहेत. एवढेच नाही तर मनसेने वातावरण निर्मितीसाठी महामोर्चाचा पहिला टिझर रिलीज केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा निघणार आहे. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने नवा मार्ग निवडला आहे.

गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर रविवारी (9 फेब्रुवारी) मनसे महामोर्चातून शक्तिप्रदर्शन करणार आहे. आझाद मैदान येथे पोलिसांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी ऑगस्ट 2012 मध्ये राज ठाकरे यांनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढला होता. तब्बल 8 वर्षांनी मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरे पुन्हा एकदा पक्षातर्फे आयोजित महामोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारला आहे. मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारे पोस्टर झळकले आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (वर्सोवा विधानसभा) वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा’ असं पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आले आहे. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावे आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवे. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असे मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केले होते.

First published:

Tags: #Mumbai, Mns morcha