Home /News /maharashtra /

मनसेचा ठाकरे सरकारला 'झटका', पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड

मनसेचा ठाकरे सरकारला 'झटका', पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड

पोलिसांनी बळाचा वापर करत काही आंदोलकाना घेतलं ताब्यात

    मुंबई, 26 नोव्हेंबर: वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे, MNS) उडी घेतली आहे. मनसेने गुरूवारी राज्यभरात 'झटका मोर्चा'चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली असल्यानं मनसैनिकांची धरपकड सुरू झाली आहे. राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी संपूर्ण राज्यभर मनसेचं आंदोलन होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. हेही वाचा..कृषी बिलविरोधात बळीराजा आक्रमक, पोलिसांकडून पाणी-अश्रूधुराचा वापर, पाहा VIDEO मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन  सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर पोलीस आपलं काम करतात. आम्ही आमचं काम करतो आहे, आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. औरंगाबाद मनसेचं आंदोलन चिरडलं... औरंगाबाद शहरात मनसेचं आंदोलन पोलिसांनी चिरडलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत काही आंदोलकाना ताब्यात घेतलं आहे. महात्मा फुले चौकातून मोर्चा जाऊ दिला नाही. दुसरीकडे, ठाण्यात मनसैनिकांची धरपकड सुरु झाली आहे. पुण्यात पोलिसांनी मोर्चा रोखला वाढीव वीजबिलाविरोधात काढलेल्या मनसेचा पुण्यात पोलिसांनी रोखला आहे महामोर्चातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलीस ठाण्यात आणलं आहे. मनसेची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. मनसे मोर्चामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळाल्या आहेत. फारसखाना पोलीस ठाण्यात मनसेने धरणे आंदोलन सुरू केलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना येथेच बोलवा, नाहीतर आम्हाला ताब्यात घेऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते जसे शनिवार वाड्याजवळ पोहचतायत तसे पोलिस त्यांना ताब्यात घेऊन गाडीत घालून पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. मनसेच्या मोर्चाला परवानगी नसल्याने कारवाई होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हेही वाचा...भिवंडीत तणाव! मोबाईलचं आमिष दाखवून नराधमानं अल्पवयीन मुलीच्या अब्रुचे तोडले लचके वांद्रे पूर्वमधून मनसेच्या मोर्चाला सुरुवात वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाला सुरूवात झाली आहे. सरकारविरोधी घोषणांचे फलक घेऊन मुंबईतील वांद्रे पूर्वमधून मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
    First published:

    Tags: Maharashtra, MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या