मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...', मनसेचा शरद पवारांवर पलटवार

'आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...', मनसेचा शरद पवारांवर पलटवार

Sharad Pawar Raj Thackeray

Sharad Pawar Raj Thackeray

ज्या पक्षाला हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदारही निवडून आणता येत नाहीत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला होता. शरद पवारांच्या या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 22 सप्टेंबर : ज्या पक्षाला हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदारही निवडून आणता येत नाहीत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला होता. शरद पवारांच्या या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवरून शरद पवार यांच्या या टीकेवर पलटवार केला आहे. 'आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा....बोटं तोंडात घालाल. आम्ही 'धन'से कमी आहोत, पण 'मनसे' लई आहोत. #मौका_सभी_को_मिलता_है आदर देतोय, आदर घ्या.' असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे. संदीप देशपांडेंची टीका शिवसेनेवर टीका करत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. शिवसेना शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातली मांजर झाली आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे. शिवसेनेने राज ठाकरेंचा धसका घेतला आहे. कितीही म्याव म्याव केलं तरी पिंजऱ्यातल्या मांजराला डरकाळी फोडता येत नाही. बाळासाहेबांचे विचारच नाही तर दसरा मेळावा घेऊन काय फायदा? तुम्ही शरद पवारांचेच विचार देणार आहात, ते कधीही देता येतात, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली होती. संदीप देशपांडे यांनी केलेल्या या टीकेवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ज्या पक्षाला हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदारही निवडून आणता येत नाहीत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? अशी प्रतिक्रिया दिली होती.
First published:

Tags: MNS, Raj Thackeray, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या