मनसे आमदाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

मनसे आमदाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली, 15 डिसेंबर : आंध्र प्रदेश विधानसभेनं शुक्रवारी 'दिशा विधेयक' पारित केलं. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे 21 दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. बलात्काऱ्यांना फाशी देणारं आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे. यावर आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी याबाबत आता सरकारला प्रश्न विचारला आहे.

'आंध्र प्रदेशमध्ये दिशा विधेयक पारित झालं, महाराष्ट्र राज्यात कधी? असा प्रश्न राजू पाटील यांनी सोशल मीडियातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. महाराष्ट्र राज्याने सुद्धा हे विधेयक आणून सर्वानुमते पारित केले पाहिजे आणि पुढचे पाऊल महाराष्ट्राने टाकावे, असं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.

काय आहे विधेयकात तरतूद?

सुधारित दिशा विधेयकात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाल्यापासून 21 दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण करून मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. विधेयकात भारतीय दंड विधानाच्या 354 कलमात दुरुस्ती करण्यात आली असून 354(ई) हे कलम बनवण्यात आलं आहे. सुधारणा कायद्यानुसार, अशा प्रकरणात जेथे साक्षीपुरावे उपलब्ध आहेत, तेथे तपास सात दिवसांत पूर्ण करून आणि पुढील 14 दिवसांत कोर्टात सुनावणी झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत शिक्षा दिली जावी असे म्हटले आहे.

बुलेट ट्रेनबाबत घेतली होती आक्रमक भूमिका

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर राजू पाटील यांनी बुलेट ट्रेनबाबतही आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधलं होतं. 'आता 'U''T'urn नको! बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणारा हिस्सा व त्यासाठी BKC व इतर ठिकाणी भू संपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे. बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची #हीच ती वेळ आहे.', असे ट्वीट आमदार राजू पाटील यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2019 09:38 PM IST

ताज्या बातम्या