'हा' निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगताय, मनसे आमदाराची टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याची दीर्घकालीन मागणी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य करत या गावांची आज नगरपरिषद घोषित केली

कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याची दीर्घकालीन मागणी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य करत या गावांची आज नगरपरिषद घोषित केली

  • Share this:
डोंबिवली, 14 मार्च  : कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याची दीर्घकालीन मागणी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य करत या गावांची आज नगरपरिषद घोषित केली. मात्र, यावेळी 27पैकी 9 गावं केडीएमसीतच ठेवल्यानं नाराजी पसरली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावं वगळावी, अशी स्थानिकांची मागणी होती. तर इथले नगरसेवक मात्र, केडीएमसीतच राहण्याच्या बाजूने होते. दुसरीकडे 27 गावांची एकूण लोकसंख्या ३ लाखांच्या पुढे असल्यानं नगरपालिका करणं शक्य नसल्यानं ऐनवेळी या 27 पैकी 9 गावं केडीएमसीतच ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, या 9 गावांमध्ये डोंबिवली एमआयडीसीचा देखील समावेश आहे. त्यामुळे शिवसेनेनं यात पक्षपतीपणा केल्याचा आरोप मनसे आणि भाजपनं केलाय. 'हा निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगत असल्यासारखा प्रकार असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही राजू पाटील यांनी सांगितलं. तर भाजपचे नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनीही शिवसेनेनं पक्षपतीपणा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता वेगळी नगरपालिका होऊनही इथले वाद काही संपताना दिसत नाही. 27 पैकी 18 गावांचीच वेगळी नगरपरिषद! दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांची सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती, सर्वपक्षीय युवा मोर्चा तसंच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी शासनाकडे याबाबत वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यानुसार, कल्याण-डोंबिवली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातून 27 गावं वगळून या गावांच्या क्षेत्राकरिता नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसुचनेच्या अनुषंगाने प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना कळविण्यात आले. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी प्राप्त सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा अहवाल शासनास सादर केलेला आहे. हा अहवाल विचारात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांपैकी बहुतांश शीळ-कल्याण रस्त्याचे पश्चिमेस असणाऱ्या 9 गावांचे (आजदे, सागाव, नांदविली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा) मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असल्यामुळे ही गावे महानगरपालिकेमध्ये कायम ठेवण्यात येणार आहेत. तर उर्वरित 18 गावे (घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे) महानगरपालिकामधून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार, असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
First published: