लॉकडाउनमध्ये रस्ते कामावर मनसे आमदाराचा आक्षेप, कंत्राटदारावर केली कारवाईची मागणी

लॉकडाउनमध्ये रस्ते कामावर मनसे आमदाराचा आक्षेप, कंत्राटदारावर केली कारवाईची मागणी

कल्याण-शीळ रस्त्याची गुणवत्ता तपासून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 12 मे : लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना घरातून बाहेर निघण्यास मनाई आहे. त्यामुळे  प्रशासनाकडून रस्ते विकासाचे काम हाती घेण्यात आली आहे. परंतु, कल्याण-शीळ रस्त्याची गुणवत्ता तपासून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याबद्दल राजू पाटील एमएसआरडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम मोपलवर यांना पत्र लिहिले आहे.

कल्याण-शीळ रस्ता ठाणे, नवीमुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी महत्वाचा रस्ता असून रोज हजारो वाहनं या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल.

हेही वाचा - मुंबईत 93 वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोरोनाला हरवलं, डॉक्टरांनीही केलं कौतुक

 

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने सध्या रस्त्यावर खूप कमी प्रमाणात वाहन रहदारी सुरू आहेत. अशावेळी कंत्राटदाराला काम जलदगतीने व दर्जेदार करण्यास कोणतीही अडचण असेल असे वाटत नाही. परंतु, काम सुरू केल्यापासून कामाच्या दर्जाबाबत अनेक जणांच्या तक्रारी व व्हिडिओ येत आहेत. यामध्ये कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे आढळून आले असून असे काम सुरू असताना एमएसआरडीसीचे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत', असा आरोप राजू पाटील यांनी केला.

त्यामुळे शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या कामाच्या कामाच्या दर्जाबाबत चौकशीचे आदेश द्यावेत व त्रयस्थ संस्थेमार्फत गुणवत्ता चाचणी केल्याशिवाय कंत्राटदाराला कामाचे बिल देऊ नये, अशी मागणी पाटील यांनी केली.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 4:30 PM IST

ताज्या बातम्या