मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंची सुरक्षा काढल्यामुळे मनसे आमदार भडकले, म्हणाले...

राज ठाकरेंची सुरक्षा काढल्यामुळे मनसे आमदार भडकले, म्हणाले...

'राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे  सरकारचे घाणेरडे राजकारण आहे.  राज ठाकरेंना कुठल्याही सुरक्षेची गरज नाही'

'राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण आहे. राज ठाकरेंना कुठल्याही सुरक्षेची गरज नाही'

'राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण आहे. राज ठाकरेंना कुठल्याही सुरक्षेची गरज नाही'

  • Published by:  sachin Salve

नवी मुंबई, 10 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडीची सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

'राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे  सरकारचे घाणेरडे राजकारण आहे.  राज ठाकरेंना कुठल्याही सुरक्षेची गरज नाही, त्यांच्या सुरक्षेसाठी मनसेसैनिक खंबीर आहेत', अशा शब्दांत राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

'गेल्या काही वर्षांपापासून सत्तेत आलेलं सरकार विरोधकांचे नगरसेवक पळवत आहे, हा आता ट्रेंड झाला आहे.  जो सत्तेत असतो तो त्याचा गैरवापर करत असतो. राजकारणाचा हा पॅटर्न बदलला पाहिजे. जे बेडूक उड्या मारतात त्यांना घरी बसवलं पाहिजे, त्याशिवाय हे थांबणार नाही' असंही राजू पाटील म्हणाले.

'नवी मुंबई महापालिकेत भाजपा सोबत युतीचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्या युती संदर्भातील निर्णय हे राज ठाकरे घेतील. आम्ही सर्व जागा लढवण्याची तयारी केली असून त्याप्रमाणे कामाला देखील लागलो आहोत', असंही राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांनीही केली सुरक्षा काढून घेण्याची मागणी

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माजी मंत्री आणि विरोधकांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी 'माझ्या सुरक्षेत कपात करावी' अशी मागणीच केली आहे. 'इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, तर माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी', अशी मागणी पवार यांनी केली आहे.

फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढली

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल असताना सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे.  तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा दिली आहे ती आधी वाय प्लस सुरक्षा होती.

या नेत्यांना आणि दिग्गजांना पुरवण्यात आली सुरक्षा

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री  विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर,दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आमदार वैभव नाईक हे नारायण राणे यांचे विरोधक आहे म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांना प्रथमच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.  तसंच कोल्हापूरमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांची सुरक्षा वाढवली आहे.

First published: