मनसेच्या एकमेव आमदाराची घणाघाती टीका, सत्तासंघर्षावरून राजू पाटील म्हणाले....

मनसेच्या एकमेव आमदाराची घणाघाती टीका, सत्तासंघर्षावरून राजू पाटील म्हणाले....

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे, 13 नोव्हेंबर, कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (मंगळवारी)सत्तास्थापनेच्या गोंधळावरून टीका केल्यानंतर आता मनसेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'महाराष्ट्रात शिवसेना भाजपला बहुमत मिळूनदेखील सत्ता स्थापनेत आलेलं अपयश हा युतीने महाराष्ट्राच्या जनतेचा, मतदारांचा केलेला अपमान आहे,' असं म्हणत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे आमदार राजू उर्फ प्रमोद पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाने युती करून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये  महाराष्ट्राच्या जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले असतानादेखील सरकार स्थापन करण्यात महायुतीला अपयश आलं आहे. त्यामुळे युतीने महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केल्याची टीका कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी केली आहे. तसंच सत्ता स्थापनेसाठी पोरखेळ चालू आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात विधानसभा निवडणूक पुन्हा होणार असतील तर सर्वांना परवडण्यासारखे नाही. मात्र झालीच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज असल्याची प्रतिक्रिया प्रमोद पाटील यांनी यावेळी दिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेचा प्रमोद पाटील यांच्या रूपाने एकमेव आमदार निवडून आला आहे. निवडून आल्यापासून पाटील हे आपल्या मतदारसंघात कामाला लागेल आहेत. रेल्वे, पुलकोंडी, अवकाळी पावसळामुळे झालेलं शेतीचं नुकसान असे विषय घेत त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा चालू करत भेटीगाठीला सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे सत्तास्थापन होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अद्याप या तीनही पक्षांची बोलणी पूर्ण झालेली नाही.

शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

Published by: Akshay Shitole
First published: November 13, 2019, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading