राज ठाकरेंनंतर मनसेचा आमदारही आक्रमक, केला गंभीर आरोप

राज ठाकरेंनंतर मनसेचा आमदारही आक्रमक, केला गंभीर आरोप

राजू पाटील यांनी सडकून टीका करत एमआयडीसी आणि केडीएमसी भ्रष्टाचाराचे नंदनवन झाले आहे, असा घणाघात केला आहे.

  • Share this:

डोंबिवली, 23 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसी चांगलीच गाजत आहे. गुलाबी रस्ता, कंपनी मधील मोठी आग आणि गटारांची निकृष्ट दर्जाची कामे चर्चेचा विषय ठरत आहे. यावर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सडकून टीका करत एमआयडीसी आणि केडीएमसी भ्रष्टाचाराचे नंदनवन झाले आहे, असा घणाघात केला आहे.

एमआयडीसी मध्ये सध्या 29 कोटींची गटारांची कामे चालू आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची चालू असून कालच गटाराचे बांधकाम करताना भिंत पडली. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. 'एमआयडीसी आणि केडीएमसी भ्रष्टाचाराचे नंदनवन झाले आहे. दोन्ही ठिकाणी काम करण्यासाठी कंत्राटदार येत नाहीत. एमआयडीसीच्या रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी बॅंर्नर लावले पण टेंडर निघत नाही. कोपरपुलाचे पण तसेच झाले. जिथे कामे चालू आहेत तिथे नागरिकांनी सुद्धा लक्ष घातले पाहिजे,' असं राजू पाटील म्हणाले.

दरम्यान, एकीकडे राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विविध मुद्द्यांवरून आक्रमक होत असताना पुण्यात मनसेच्या ऑपरेशन बांगलादेशी मोहिमेचा फज्जा उडाला आहे. शनिवारी बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेतलेलं भारतीय निघाले आहेत. पुणे पोलिसांनी तिघांनाही सोडून दिलं आहे. झाल्या प्रकाराबद्दल तिघानांही नाहक मनस्ताप झाला. या तिघांनीही कालच भारतीय असल्याचं म्हटलं होतं. पण तरीदेखील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

पुण्याच्या धनकवडीतील बालाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांग्लादेशी घुसखोरांचा शोध सुरू केला होता. शनिवारी सकाळी मनसेचे तब्बल 50 कार्यकर्ते पुण्यातील बालाजीनगर परिसरात नागरिकांचे ओळखपत्र तपासत होते. त्यातील तीन संशयित बांगलादेशी घुसखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पण ते आता भारतीय असल्याचं समोर आलं आहे.

ताब्यात घेतलेले तिघेही कुटुंब धनकवडीतील बालाजीनगरमध्ये राहतात. त्यांनी आम्ही बांगलादेशी नसून पश्चिम बंगालचे असल्याचा दावा केला होता. तशी ओखळपत्रंही त्या कुटुंबाकडून दाखविण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली. त्यात ते भारतीय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मनसेच्या मोहिमेचा फज्जा उडाला अशीच चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dombiwali
First Published: Feb 23, 2020 11:42 PM IST

ताज्या बातम्या