कल्याण, 21 नोव्हेंबर: कल्याण शहरातील पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग (Kalyan patri bridge guarder launching) म्हणजे चांद्रयान लाँचिंग (Chandrayan launching) आहे का? यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशा शब्दांत मनसेचे कल्याणचे (ग्रामीण) आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil)यांनी शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना टोला लगावला आहे.
पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगला आदित्य ठाकरेंची उपस्थित होते. त्यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. त्यांनी इतर रखडलेल्या कामांमध्येही लक्ष घालावं, असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...लग्नाला आले होते 55 पाहुणे... पण न आलेल्या 177 जणांना झाला कोरोना, 7 दगावले
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज 2 वर्षे रखडलेल्या पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम सुरु केले गेलं. यावरून आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. त्यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर यावेळी निशाणा साधला.
दरम्यान, कल्याण शहरातील पत्री पुलाला जोडणाऱ्या 90 फुटाच्या रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम आज सुरु झालं. पुढील दोन दिवस हे काम चालणार आहे. विशेष म्हणजे या लाँचिंगच्या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवर खोचक टीका केली आहे.
दरम्यान, पत्री पुलाचं गर्डर लॉंचिंगचं काम पाहण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे गेले असता त्यांची वाट पोलिसांनी अडवली. त्यामुळे राजू पाटील प्रचंड संतापले होते. त्यांनी थेट शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
आमदार राजू पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे हे गर्डर लाँचिंगसाठी कल्याणला आले होते. त्यांनी केवळ पत्री पूल कामाची पाहणी न करता ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूल, कोपर पूल, पलावा पूल, आंबिवली येथील रेल्वे उड्डाण पूल यांचीही कामं मार्गी लावावीत. पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही, असा टोला देखील लगावला.
पत्री पुलाच्या कामात श्रेय वादाची लढाई...
दुसरीकडे, कल्याणमधील पत्री पुलाच्या कामावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पत्री पुलाच्या कामाबाबत केंद्र सरकारचे आभार मानले.
पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम शनिवारी सुरू झालं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे येणार असल्याचं समजताच भाजपनं आपला डाव साधला. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पत्री पुलाबाबत केंद्र सरकारचे आभार मानले.
हेही वाचा...आईनं कष्टानं कमावलेले पैसे मुलानं उडवले दारु आणि इतर व्यसनात, नंतर केला असा बनाव
माणकोली, दुर्गाडी, कोपर, पलावा या पुलांचे काम कधी पूर्ण करणार, असा सवाल राज्य सरकारला उपस्थित केला आहे. यावरून आता पत्री पुलाच्या कामावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Kalyan, Maharashtra, MNS, Shiv sena, Thane