मुंबई, 27 जानेवारी : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उशिरा आले होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांतच ते रंगशारदामधून बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. आज रंगशारदामध्ये मनसेची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शॅडो कॅबिनेटसंदर्भात आज या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, शॅडो कॅबिनेटसंदर्भात निर्णय घेण्यात आला की नाही याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र राज ठाकरे अचानक रंगशारदामधून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शॅडो कॅबिनेट म्हणजे नेमकं काय?
- विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला 'शॅडो कॅबिनेट' म्हणतात.
- अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात
- कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे 15 ते 20 मंत्री
- राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो
- काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र 33 मंत्र्यांचा समावेश
- त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी