मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माझं काम त्यांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय, ते पुत्रप्रेमापोटी वैफल्यग्रस्त : वैभव खेडेकर

माझं काम त्यांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय, ते पुत्रप्रेमापोटी वैफल्यग्रस्त : वैभव खेडेकर

"रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत आता संपत आलेली आहे. जाताजाता काहितरी करावं, या विचारातून त्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिली", असा घणाघात वैभव खेडेकर यांनी केला.

"रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत आता संपत आलेली आहे. जाताजाता काहितरी करावं, या विचारातून त्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिली", असा घणाघात वैभव खेडेकर यांनी केला.

"रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत आता संपत आलेली आहे. जाताजाता काहितरी करावं, या विचारातून त्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिली", असा घणाघात वैभव खेडेकर यांनी केला.

रत्नागिरी, 24 डिसेंबर : शिवसेना (Shiv Sena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी विधान परिषदेत खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्या निलंबनाची मागणी केली. तसेच विधान भवन (Vidhan Bhavan) परिसरात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खेडेकरांवर गंभीर आरोप (allegations) केले. त्यांच्या आरोपांवर आता वैभव खेडेकरांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. "रामदास कदम हे पुत्रप्रेमापोटी वैफल्यग्रस्त अवस्थेत अनेक चुका करत आहेत. त्यातीलच ही चूक आहे. त्यांनी ती चूक परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलीच. पण माझ्याबाबतही ते सातत्याने करत आहेत", असा घणाघात वैभव खेडेकर यांनी केला.

'मला बदनाम करण्याचा प्रयत्न'

"रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत आता संपत आलेली आहे. जाताजाता काहितरी करावं, या विचारातून त्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिली आहे. यातून सतत्यता उघड होईल. त्यांनी पुलाचं प्रकरण सांगितलं. त्याठिकाणी माझा कोणताही बंगला किंवा बिल्डिंग नाही. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याबाबत मी कोर्टात जाईलच", असं वैभव खेडेकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा : राज्यात Corona निर्बंधाबाबतची नवी नियमावली दुपारी होणार जाहीर, 'असे' असतील नवे निर्बंध

"विधान परिषदेत खरंतर 'हे' प्रकरण गाजायला हवं"

"ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही अशा पुलाशी माझा वारंवार संबंध जोडला जातोय. तिथे माझं एक रुपयाचं बांधकाम नाही. तिथे माझा कुठलाही फ्लॅट नाही. तरीही ते लोकं सातत्याने माझ्यावर आरोप करत आहेत. हेच अध्यक्ष असलेल्या शिवसेना आरोग्य सेवा संस्थेने खेड नगरपालिकेचा भूखंड शंभर टक्के सत्ता असताना घेतलेला आहे. त्यांनी ठराव करुन एक रुपया नाममात्र भाड्याने तो भूखंड घेतलेला आहे. त्यावर मोठी बिल्डिंग बांधली आहे. या बिल्डिंगच्या परवानगीत तफावत आहे. अपूर्ण कागदपत्रांच्या आधारावर बिल्डिंगला परवानगी दिली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवले असून अहवाल दिलेले आहेत. विधान परिषदेत खरंतर हे प्रकरण गाजायला हवं होतं. या विषयावर मी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अशा पद्धतीच्या काही गोष्टी समोर आणून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पण सभागृहातील सर्व सदस्य प्रगल्भ आणि विचार करणारे आहेत. या प्रकरणात लवकरच सत्य बाहेर येईल", असं खेडेकर म्हणाले.

हेही वाचा : वैभव खेडेकर नेमके कुणाचे जावई? रामदास कदम यांचा विधानभवन परिसरात सवाल

'माझं काम त्यांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय'

"गेली पाच वर्षे मी खेड नगरपालिकेत काम करतो आहे. हेच काम त्यांच्या डोळ्यांमध्ये खुपत आहे. त्यामुळे ते वारंवार माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट्य आहे. ते न्यायालयाच्या कक्षेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा इतर अहवालात मला कुठेही वैयक्तिकरित्या दोषी ठरविण्यात आलेलं नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मी फार काही बोलणार नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली.

'रामदास कदमांच्या दबावाखाली नगरसेवकांचा अपात्रतेचा प्रस्ताव'

"डिझेल घोटाळ्याबद्दल बोलायचं झालं तर पाच रुपयाची वस्तूदेखील माझ्या स्वाक्षरीशिवाय काढता येत नाही हे सर्व नगरसेवकांना माहिती आहे. पण रामदास कदम यांच्या दबावाखाली त्यांनी अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला. ते मला वैयक्तिक आयुष्यात दबाव असल्याचं सांगत आहेत", अशी प्रतिक्रिया वैभव खेडेकर यांनी दिली.

First published:
top videos