मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

संदीप देशपांडेंनी सहाय्यक आयुक्तांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर संदीप देशपांडे यांची चौकशी करण्यात आली. दिवाळीचे अनधिकृत कंदिल काढण्यावरुन संदीप देशपांडे यांचा वॉर्ड ऑफिसरसोबत वाद झाला होता. याप्रकरणी जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी तक्रार केली होती.

सहाय्यक आयुक्तांना शिव्या दिल्याप्रकरणी जी उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं. जी उत्तर (दादर)भागातील मनसेने दिवाळीत कंदील आणि झेंडे लावले होते. हे झेंडे काढत असताना संदीप देशपांडेंनी सहाय्यक आयुक्तांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांसोबतच्या राड्यानंतर संदिप देशपांडे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे तसंच धमकावणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे संदीप देशपांडे यांचं म्हणणं?

'मी कोणत्याही अधिकाऱ्याला शिव्या दिल्या नाहीत. कामाचा जाब विचारला म्हणून 353 अंतर्गत गुन्हा दाखल करणार असाल तर आम्ही जामीनच घेणार नाही. शिवसेनेचे झेंडे काढले जात नाहीत. फक्त मनसे चे झेंडेच काढले जातात,' असा आरोप संदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या