परप्रांतीयांचे लोंढे थांबवण्यासाठी 'मनसे' उपाय, अमित शहांकडे केली 'ही' मागणी

परप्रांतीयांचे लोंढे थांबवण्यासाठी 'मनसे' उपाय, अमित शहांकडे केली 'ही' मागणी

स्टेट रजिस्टर ऑफ सिटीझन संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

  • Share this:

अक्षय कुडकेलवाल, मुंबई, 3 डिसेंबर : नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन प्रमाणेच स्टेट रजिस्टर ऑफ सिटीझन संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन अर्थात एनआरसी हे सर्वप्रथम आसाममध्ये लागू करण्यात आले होते. ज्यानुसार 24 मार्च 1971 पर्यंत नोंद असणाऱ्यांनाच भारताचे नागरिकत्व लागू राहील.

आसाम प्रमाणेच एनआरसी कायदा संपूर्ण देशात लागू केला जाईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर एसआरसी लागू करावी म्हणजे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांवर निर्बंध येईल आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल असे ट्वीट काल संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शाहा यांनी मोठी घोषणा केली होती. संपूर्ण देशभर राष्ट्रीय नागरिक नोंदणी उपक्रम (NRC)राबवणार असल्याचं त्यांनी राज्यसभेत सांगितलं. NRC ची प्रक्रिया कुठल्याही धर्माच्या आधारावर केली जाणार नाही. धार्मिक, वांशिक भेदाभेद यामध्ये नसतील, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं.

NRC वर राज्यसभेत चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. "धर्माधारित नागरिक नोंदणी करणं या NRC मध्ये अपेक्षित नाही. ज्यावेळी देशभर NRC करण्यात येईल, त्यावेळी पुन्हा एकदा आसाममध्येही ही प्रक्रिया होईल. कुठल्याही धर्माच्या नागरिकांना NRC पासून धोका नाही. त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेला घाबरून जाऊ नये. सर्व समूहांना NRC अंतर्गत सामावून घेण्याची व्यवस्था आहे," अशी माहिती अमित शहांनी राज्यसभेला दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 09:58 AM IST

ताज्या बातम्या