मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'उद्या तुमचीपण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा', मनसेचा खोचक टोला

'उद्या तुमचीपण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा', मनसेचा खोचक टोला

संजय राऊत सध्या पत्रा चाळ संबंधित आरोपांप्रकरणी आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यामुळे व्यासपीठावर त्यांच्या नावाची खुर्ची रिकामी होती. त्यांच्या रिकाम्या खुर्चीवरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. तर दुसरीकडे मनसेकडून त्याच खुर्चीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 21 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व गटप्रमुख, कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची होती. खुर्चीवर संजय राऊत यांचं नाव लिहिलेलं होतं. राऊत सध्या पत्रा चाळ संबंधित आरोपांप्रकरणी आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची खुर्ची रिकामी होती. त्यांच्या रिकाम्या खुर्चीवरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. तर दुसरीकडे मनसेकडून त्याच खुर्चीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती. उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा", असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. ('शिवसैनिकांना नोकर समजलं तर खपवून घेणार नाही', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर दिल्लीतून 'बाण') मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. "मर्द, अवलाद, खंजीर, गद्दार, कोथळा, निष्ठा या शब्दांची टोमणे मेळाव्यापूर्वीची उजळणी विनोदी होती. त्यात नवीन गोष्ट गोचीड, कुत्रा व गाय हे ऐकून तर कान सुखावले. दसऱ्याला टोमणे मेळाव्यात अजून काय-काय मनोरंजन होणार याची महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड उत्सुकता", अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे संजय राऊतांबद्दल भाषणात नेमकं काय म्हणाले? "व्यासपीठावर आल्यावर मी दोन गोष्टी बघितल्या. एक रिकामी खुर्ची पाहिली संजय राऊत यांची. एक खुलासा करुन टाकतो. नाहीतर, उद्या चौकट यायची संजय राऊत मिंदे गटामध्ये गेले. सगळे मिंदे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. या लढाईत सोबत आहेत. ते तलवार हातात घेवून आघाडीवर आहेत", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
First published:

Tags: MNS, Sandeep deshpande, Uddhav thackeray

पुढील बातम्या