मुंबई, 1 सप्टेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका सगळ्यांनाच परिचित आहे. पण या वर्षी जानेवारीत त्यांच्या पक्षाने भगवा झेंडा हाती घेतल्याने राज यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. राज यांची हिंदुत्ववादी भूमिका अधिक ठळक करणारा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ आता 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागला आहे.
हेही वाचा...गौरव आर्यासोबत कोट्यवधींचा गुंतवणूक, कर्नाटकच्या आमदाराला ED चा समन्स
राज ठाकरे यांच्या यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शांती पाठाचं पठण केलं. त्यामुळे राज यांची हिंदुत्वाची भूमिका अधिकच गडद झाल्याचं पाहायलं मिळत आहे.
शिवसेनेला निष्ठावंतानीच दिली सोडचिठ्ठी...
शिवसेनेच्या निष्ठावंतांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मनसेत प्रवेश केला आहे. यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कबंर कसली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ही समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला होता.
राज यांची हिंदुत्वाची भूमिका अधिकच गडद, सेना नेते येताच केलं शांती पाठाचं पठण@RajThackeray @CMOMaharashtra pic.twitter.com/v7oEFZFztT
— News18Lokmat (@News18lokmat) September 1, 2020
राज ठाकरेंच्या बदललेल्या लूकची सर्वत्र चर्चा...
दुसरीकडे, कोरोना व्हायरस नावाच्या संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर करत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. भारतानेही बऱ्याच काळासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. लॉकडाऊनमुळे लोक घरातच अडकून पडले आणि अक्षरश: सलूनमध्ये जाणंही अवघड झालं. यामुळे अभिनेत्यांपासून नेत्यांपर्यंत अनेकांचे लूक आपोआप बदलले आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या लूकची चर्चा सर्वत्र चर्चा होत आहे.
राजकीय नेत्यासोबतच एक उत्तम वक्ता म्हणूनही राज ठाकरे यांची ओळख आहे. राजकारणात जे काही उत्तम भाषण करणारे नेते आहेत. त्यात राज ठाकरे यांचं नाव कायम चर्चेत असतं. भाषण कलेसह राज ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून देखील कायम चर्चेत असतात. त्यांची आक्रमक शैली आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे अनेक तरुण त्यांना फॉलो करतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बदलल्या लूकची दखल घेतली जाणार नाही, असं होणार नाही.
हेही वाचा...आरोग्य विषयक आणीबाणीत कायदेभंगाची भाषा अयोग्य, संजय राऊतांचा आंबेडकरांना टोला
राज ठाकरे यांनी दाढी वाढवली असून गॉगल्स घातलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून शेअर केला जात आहे. यापूर्वी राज ठाकरे यांचे वेगवेगळे लुक्स चर्चेचा विषय झाला होता.