राज ठाकरेंच्या मनसेसैनिकांचे पाकिट मारणे पडले भारी, जागेवरच 'खळ्ळ-खट्याक' प्रसाद LIVE VIDEO

राज ठाकरेंच्या मनसेसैनिकांचे पाकिट मारणे पडले भारी, जागेवरच 'खळ्ळ-खट्याक' प्रसाद LIVE VIDEO

मनसेच्य कार्यकर्त्यांनी पाकीट मार संशयिताला पकडले आणि चांगलाच चोप दिला.

  • Share this:

नाशिक, 05 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackery) नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर आहे. शहरात दाखल झाल्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज यांना भेटण्यासाठी पोहोचले असता गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी संधी साधली. परंतु, मनसैनिकांनी या चोरट्याला पकडून चांगलाच चोप दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. राज ठाकरे आज सकाळीच नाशिक शहरात दाखल झाले आहे.  नाशिकच्या हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये राज ठाकरे मुक्कामी थांबले आहे. त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीत कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गर्दीत घुसले होते. एका कार्यकर्त्याचे पाकीट मारताना हा प्रकार उघडकीस आला. मनसेच्य कार्यकर्त्यांनी पाकीट मार संशयिताला पकडले आणि चांगलाच चोप दिला. या चोरट्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरट्याकडून हजारो रुपये आढळून आले आहे. पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.

दरम्यान, आज सकाळी राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क घातले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि 'मास्कवर मास्क' असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केले.

राज ठाकरे यांनी माजी महापौरांना मास्क काढण्याचा इशारा केल्यामुळे उपस्थितीत असलेल्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लगेच आपल्या चेहऱ्यावर लावलेले मास्क बाजूला केले आणि राज ठाकरे यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनीही मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यातही विना मास्क एंट्रीवर प्रशासन काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: March 5, 2021, 3:16 PM IST

ताज्या बातम्या