कोरोनाच्या ब्रेकनंतर राज ठाकरे अॅक्टिव्ह! औरंगाबादेत शिवसेनेला दिला 'दे-धक्का'

कोरोनाच्या ब्रेकनंतर राज ठाकरे अॅक्टिव्ह! औरंगाबादेत शिवसेनेला दिला 'दे-धक्का'

औरंगाबादेतील शिवसेना आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेत प्रवेश केला.

  • Share this:

पुणे, 31 ऑगस्ट: कोरोनाच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे राज यांनी औरंगाबादेत शिवसेना दे-धक्का दिला आहे. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.

औरंगाबादेतील शिवसेना आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेत प्रवेश केला. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे माजी खासदार आणि गटनेते चंद्रकांत खैरे यांना धक्का दिला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कबंर कसली आहे.

हेही वाचा...आरोग्य विषयक आणीबाणीत कायदेभंगाची भाषा अयोग्य, संजय राऊतांचा आंबेडकरांना टोला

निष्ठावंतानीच शिवसेनेला दिली सोडचिठ्ठी...

शिवसेनेच्या निष्ठावंतांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मनसेत प्रवेश केला आहे. यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ही समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला होता.

राज ठाकरेंच्या बदललेल्या लूकची सर्वत्र चर्चा...

दुसरीकडे, कोरोना व्हायरस नावाच्या संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर करत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. भारतानेही बऱ्याच काळासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. लॉकडाऊनमुळे लोक घरातच अडकून पडले आणि अक्षरश: सलूनमध्ये जाणंही अवघड झालं. यामुळे अभिनेत्यांपासून नेत्यांपर्यंत अनेकांचे लूक आपोआप बदलले आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या लूकची चर्चा सर्वत्र चर्चा होत आहे.

टाळेबंदी कालावधीत अनेक नेते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहेत. काहींनी हेअर स्टाईल म्हणून जास्त केस वाढवले आहेत, तर काहींनी दाढी वाढवत लूक बदलला आहे. यामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. मात्र, आता सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा न्यू लूकमधील एक फोटो व्हायरल झाला आहे.

राजकीय नेत्यासोबतच एक उत्तम वक्ता म्हणूनही राज ठाकरे यांची ओळख आहे. राजकारणात जे काही उत्तम भाषण करणारे नेते आहेत. त्यात राज ठाकरे यांचं नाव कायम चर्चेत असतं. भाषण कलेसह राज ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून देखील कायम चर्चेत असतात. त्यांची आक्रमक शैली आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे अनेक तरुण त्यांना फॉलो करतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बदलल्या लूकची दखल घेतली जाणार नाही, असं होणार नाही.

हेही वाचा...प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द

राज ठाकरे यांनी दाढी वाढवली असून गॉगल्स घातलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून शेअर केला जात आहे. यापूर्वी राज ठाकरे यांचे वेगवेगळे लुक्स चर्चेचा विषय झाला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या