मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मनसेच्या नेत्याने राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाच्या डोक्यात घातला दगड

मनसेच्या नेत्याने राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाच्या डोक्यात घातला दगड

विधानसभेतील मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली

विधानसभेतील मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली

विधानसभेतील मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली

    गणेश गायकवाड, प्रतिनिधी अंबरनाथ, 20 जानेवारी : विधानसभेतील मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुमेध भवार असं मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय वातावरण चांगलं तंग झाले आहे. शनिवारी सायंकाळी अंबरनाथच्या कल्पना हॉटेलच्या बाहेर अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्ष सचिन अहिरेकर याला मनसे पदाधिकारी सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. यावेळी भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी अहिरेकर यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना गंभीर जखमी केलं आहे. सध्या अहिरेकर  यांच्यावर अंबरनाथ च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहिरेकर यांनी या पूर्वी भवार यांच्यासाठी अंबरनाथ विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे काम केले होते. आधी रिपाइं आठवले गटाकडून विधासभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपात आणि तिथे ही उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. भवार यांनी मनसेत प्रवेश केल्याने मी त्यांचे काम बंद केल्याचे अहिरेकर यांनी सांगितलं. मात्र, आपल्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचे अहिरेकर यांनी सांगितलंय. तर आपण मारहाण केली नसल्याचे मनसेच्या सुमेध भवार यांनी स्पष्ट केले आहे. सचिनने आपल्याला फोन करून शिवीगाळ केली त्याच बरोबर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भवार यांनी केला असून राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द  खपवून घेणार नसल्याचे सांगितलंय. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे गृहमंत्री असतांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर असा हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता अंबरनाथ राष्ट्रवादीचे पदाधिकारी या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मात्र, या प्रकरामुळे अंबरनाथमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी आमने सामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. KDMC मध्ये भाजपच्या उपमहापौरांनी दिला राजीनामा दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देत उपेक्षा भोईर यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे.  केडीएमसीमध्ये विकास कामे होत नाही, अनधिकृत बांधकामांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, असा आरोप त्यांनी केला. आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत भाजप उपमहापौर यांची अनधिकृत बांधकामाविषयी प्रस्ताव मांडला होता. पण शिवसेनेने नाटक करून विषय मांडू दिला नसल्याचा आरोप उपमहापौरांनी केला. त्यामुळे भ्रष्टाचारी शिवसेनेसोबत भाजप राहू शकत नाही, असं म्हणत त्यांनी आपल्या उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. परंतु, महापौर नसल्याने राजीनाम्याचे पत्र अद्याप दिलेले नाही. दरम्यान, शिवसेनेने उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Leader, MNS

    पुढील बातम्या