एकनाथ शिंदेंना पत्र लिहित मनसे नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा

एकनाथ शिंदेंना पत्र लिहित मनसे नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 28 जून : 'नवी मुंबई मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तीन महीने होत आले तरीही नवी मुंबई शहरात कोरोना टेस्टिंग लॅब नसल्याने आजही रिपोर्ट यायला 8 ते 10 दिवसांचा अवधी लागत आहे. अनेकांना सौम्य लक्षणे असली तरी खाजगी हॉस्पिटल ॲडमिट करुन घेते व रिपोर्ट 10 दिवसांनी निगेटीव्ह आले तरी भरमसाठ बिल वसुली करत आहेत. तर काही रुग्णांचे निदान लवकर न होत असल्याने उपचारास विलंब झाल्याने मृत्यू होत आहेत व संबंधित व्यक्तीचा संसर्ग अनेकांना होत आहे,' असं म्हणत मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे.

'...अन्यथा आंदोलन करणार', काय आहे मनसेचं पत्र?

"आजही 1073 नवी मुंबईकरांचे रिपोर्ट येणे बाकी आहे,असे मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातच म्हटले आहे. अनेकदा मनसेसह सर्व पक्षांनी, संस्थांनी, नवी मुंबईकरांनी लॅब सुरू व्हावी म्हणुन मागणी केली आहे. मात्र ती मागणी पालिका आणि आपल्या पर्यंत पोहचत नाही की काय की हेतुपूर्वक आपण याकडे कानाडोळा करत आहात असे आता आम्हांस वाटू लागले आहे.

सरकार म्हणतय तसे 77 लॅब सुरु झाल्या असतील तर नवी मुंबईत लॅब सुरु करायला काय अडसर आहे ? आमचे खासदार, आमदार ICMR कडे पाठपुरावा करायला कमी पडत आहेत काय की आपल्याला व खासदारांना ठाणेतून नवी मुंबईत लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असा प्रश्न तमाम नवी मुंबईकरांना पडला आहे.

तरी येत्या 10 दिवसात लॅब सुरु न झाल्यास नवी मुंबईकरांबरोबरच मनसे चे पदाधिकारी नवी मुंबईत विविध ठिकाणी मनपा प्रशासन व आपल्या विरोधात निषेध आंदोलन करतील याची आपण नोंद घ्यावी. नवी मुंबईकरांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आपण या पत्राला उत्तर द्याल ही अपेक्षा," असं मनसेच्या गजानन काळे यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

First published: June 28, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading