दरम्यान, परतीच्या पावसानं राज्याला दिलेल्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडे मदतीची विनवणी करत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. हेही वाचा..'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देईल, चित्रा वाघ यांचा टोला बाळा नांदगावकर यांनी जालना जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. व्हिडिओमध्ये पाण्यानं भरलेलं शेत दिसत आहे. त्यात पिके वाहून गेली आहेत. सगळी मेहनत पाण्यात गेल्याचं पाहून हादरलेला येथील शेतकरी चिखलात लोळताना दिसत आहे.मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Udhav thackarey