कोरोनाच्या कॉलर ट्यूनवर मनसे नेता भडकले, ट्वीट करून म्हणाले...

कोरोनाच्या कॉलर ट्यूनवर मनसे नेता भडकले, ट्वीट करून म्हणाले...

प्रकाश आंबेडकरांनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील ही कॉलर ट्यून तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून जनजागृतीसाठी सगळ्यांच्या मोबाईल फोनवर कॉलर ट्यून सुरू करण्यात आली. पण आता या कॉलर ट्यूनला अक्षरश: सगळेजण वैतागले. सामान्य नागरिकच नाही तर राजकीय मंडळीदेखील या कॉलर ट्यूनला वैतागले आहेत. त्यामुळे आता ही बंद करा अशी मागणी समोर येत आहे. प्रकाश आंबेडकरांनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील ही कॉलर ट्यून तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटात जनजागृती करण्यासाठी ही कॉलर ट्यून सगळ्यांच्या फोनवर चालू करण्यात आली होती. पण आता कोरोनासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. त्यामुळे आता इतर जाहिरातींच्या माध्यमातून जागृती करा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे.

कुटुंबाच्या हट्टामुळे 2 दिवस तरुणाचा मृतदेह पडून, लघवी करण्यावरून केला होता खून

'कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही,' असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

राज्यात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, काँग्रेसमध्ये खळबळ

यावेळी आणखी एक ट्वीट करत ते म्हणाले की, 'त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.'

दरम्यान, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रत्येकाच्या फोनवर ही कॉलर ट्यून लागते. अनेकदा यामुळे फोन लागत नाही किंवा फोन उचलण्यासाठी उशिर होतो. अशा तक्रारींमुळे ही कॉलर ट्यून तातडीने बंद करा अशी मागणी दूरसंचार विभागाकडे करण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 21, 2020, 11:14 AM IST

ताज्या बातम्या