वीजबिल आणि मीटर रीडिंगबाबत मनसेची उर्जामंत्र्यांकडे महत्त्वपूर्ण मागणी

वीजबिल आणि मीटर रीडिंगबाबत मनसेची उर्जामंत्र्यांकडे महत्त्वपूर्ण मागणी

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही वाढ करण्यात आली. याचा अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम होत आहे. अशात सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वीजबिलासंदर्भात उर्जामंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

'सध्याच्या परिस्थितीत व्यावसायिक मीटर रिडींग घेणे शक्य नसल्याने 2 महिन्याचे बिल हे एकत्रितपणे लॉकडाउन उठल्यावर प्रत्यक्ष रिडींग जेवढे होईल तेवढेच घेणे, हेच सर्वांच्या हिताचं राहील. कारण या 2 महिन्यात जवळपास 0 वापर झाला असताना आणि व्यावसायिकांना मागील 2 महिन्यात अनेक प्रकारचे खर्च असताना जी वीज वापरलीच नाही त्याचे मागील 6 महिन्यांचे सरासरी( Average) बिल भरायला सांगणे हे अव्यवहार्य आहे. सरासरी वीजबिल आकारल्यास आधीच अडचणीत आलेल्यांना दुष्काळात 13 वा महिना होईल. यात आम्ही कोठेही वीज बिल माफ करा अशा स्वरूपाची मागणी करत नाही. फक्त प्रत्यक्ष रीडिंग नुसारच ते बिल लॉकडाऊन नंतर घ्यावे, अशी विनंती करत आहोत,' असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - क्वारंटाइन ठेवल्या प्रकरणी नागपूर पालिकेला कोर्टाची नोटीसमार्च महिन्यात उर्जामंत्र्यांनी काय निर्णय घेतला होता?

'23 मार्च पासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देवू नये. सगळे वीज बिल अॅव्हरेज देण्यात येईल. बिल भरले नसेल तरीही वीज पुरवठा खंडित करू नये. वीज कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीज चोरी तक्रारीसाठी किंवा बिल तक्रार असल्यास ग्राहकांकडे जाऊ नये,' अशा सूचना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी 23 मार्ज रोजी दिल्या होत्या.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 4, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या