नांदगावकरांच्या गाडीला धडक, आदित्य यांच्या कार्यक्रमात मंडप उडाला हवेत

नांदगावकरांच्या गाडीला धडक, आदित्य यांच्या कार्यक्रमात मंडप उडाला हवेत

महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा मोठा अपघात टळला आहे.

  • Share this:

नाशिक, 19 डिसेंबर : महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा मोठा अपघात टळला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात बाळा नांदगावकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हाला कळवण ग्रामीण पोलीस जीपची धडक बसली.

नांदगावकर यांच्या गाडीला बसलेल्या या धडकेत इनोव्हाच्या मागील बंपरची ड्रायव्हर साईड तुटली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाचा मंडप उडाला

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूरमधील कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप हवेत उडाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पूर्ण मंडप पडू नये म्हणून कार्यकर्त्यांनी या मंडपाचे खांब पकडून धरले.

कोल्हापूर जिल्ह्यातील सरुड गावात आदित्य ठाकरेंचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी माळरानावर मंडप उभारण्यात आला होता. पण हवेमुळे हा मंडप उडाला. कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवल्याने दुर्घटना टळली.

VIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 01:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading