Home /News /maharashtra /

मंदिरात CCTV, मशिदींमध्ये आहेत का? मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आक्षेप

मंदिरात CCTV, मशिदींमध्ये आहेत का? मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आक्षेप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

    मुंबई, 20 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे मनसेने भोंग्याचा विषय लावून धरला असताना मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आणखी आक्षेप मांडला आहे. काय म्हणाले बाळा नांदगावकर? जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत. मात्र, मशिदींमध्ये CCTV आहेत का?, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.  "सर्वधर्मीय" प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये? असेही ते म्हणाले आहेत. तसेच हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हे वाचा - ''मी माझ्यानुसार काम करतोय,राजकीय कोण काय बोलतो ते...'', गृहमंत्री दिलीप वळसे पाटील भडकले भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. गुढीपाडवा सभा आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं (Raj Thackeray Rally in Aurangabad) आयोजन केलं आहे. या सभेला विरोधही होताना दिसत आहे. नाशिक पोलीस आयुक्तांचा आदेश काय? तर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असे आदेश काढण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra politics, MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या