• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाने केला 77 लाखांचा डिझेल घोटाळा, शिवसेनेनं मांडला अपात्रतेचा प्रस्ताव

मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाने केला 77 लाखांचा डिझेल घोटाळा, शिवसेनेनं मांडला अपात्रतेचा प्रस्ताव

डिझेल घोटाळ्याबरोबरच इतर 11 घोटाळ्यांची माहिती पुराव्यांसह खेड नगर पालिकेतील 9 नगरसेवकांच्या सहीने गटनेत्यांच्या मार्फत...

  • Share this:
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी खेड, 28 जानेवारी : रत्नागिरी (Ratangiri) जिल्ह्यात मनसेचे (MNS) एकमेव खेडचे नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar ) यांच्यावर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी वैभव खेडेकर यांच्याविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. महाराष्ट्रात मनसेचा एकमेव नगराध्यक्ष असलेल्या खेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर विविध अकरा घोटाळ्यासंदर्भात शिवसेनेने अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि नगरविकास मंत्रालयातील सचिवांकडे सादर केला आहे.  नगराध्यक्ष खेडेकर यांनी क वर्ग असणाऱ्या खेड नगरपालिकेत लाखो रुपयांचा डिझेल घोटाळा केला असून आपल्या अधिकारांचा गैर वापर करत इतर कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. बॉलिवूडमध्ये लग्नसराई! श्रद्धा कपूरही चढणार बोहल्यावर? वडील शक्ती कपूर म्हणाले.. वैभव खेडेकर यांनी केलेल्या कोटयवधी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये उघड झाली आहे. नगर पालिकेच्या वाहनांव्यतिरिक्त अनधिकृत आणि बेकायदेशीरीत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांमध्ये देखील बेसुमार डिझेल भरले गेले असून गेल्या 3 वर्षांत 77 लाख रुपयांचा डिझेल घोटाळा केला गेला आहे. नगरपालिकेच्या बंद असलेल्या वाहनांचे नंबर दाखवून देखील हजारो लिटर डिझेल वापरले गेले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले आहे. 'हिंदुस्तान तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही', शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी डिझेल घोटाळ्याबरोबरच इतर 11 घोटाळ्यांची माहिती पुराव्यांसह खेड नगर पालिकेतील 9 नगरसेवकांच्या सहीने गटनेत्यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अपात्रतेबाबत प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published: