मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजमुद्रा असलेला मनसेचा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये, कार्यकर्त्यांनी मालकाला चोपले, VIDEO

राजमुद्रा असलेला मनसेचा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये, कार्यकर्त्यांनी मालकाला चोपले, VIDEO

नॉन व्हेज हॉटेल असताना राजमुद्रा असलेला फोटो का वापरला? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला.

नॉन व्हेज हॉटेल असताना राजमुद्रा असलेला फोटो का वापरला? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला.

नॉन व्हेज हॉटेल असताना राजमुद्रा असलेला फोटो का वापरला? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला.

नवी मुंबई, 13 नोव्हेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा (MNS) झेंडा हॉटेलमध्ये वापरला म्हणून कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत (Navi Mumbai) हॉटेलमध्ये घुसून मालकाला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवी मुंबईतील तुर्भे इथं हॉटेल बिसमिल्लाहमध्ये हा प्रकार घडला आहे. हॉटेल बिसमिल्लाहच्या मालकाने हॉटेलमध्ये मनसेचा राजमुद्रा असलेला झेंडा वापरला होता. हॉटेलमध्ये एका भिंतीवर आधी लावलेले मेनूचे पोस्टर झाकण्यासाठी त्याने राजमुद्रा असलेला मनसेचा झेंडा चिटकवला होता.

नॉन व्हेज हॉटेल असताना राजमुद्रा असलेला फोटो का वापरला? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. पण, आपल्याला राजमुद्रा काय आहे हे माहिती नाही म्हणून झेंडा वापरला, असं हॉटेलचालकाने सांगितले. पण, मनसे कार्यकर्त्यांनी तोपर्यंत या हॉटेलचालकाला चोप दिला.

एवढंच नाहीतर हॉटेलचालकाला उठा बश्या काढायला सांगत माफी मागायला लावली. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर लावलेला मनसेचा झेंडा व्यवस्थितीपणे काढला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुम्ही घेतलेला हिरा खरा आहे की खोटा? घरच्या घरी कसा तपासून पाहाल?

याच वर्षी जानेवारी महिन्यात राज ठाकरे यांनी पक्षाचा नवा झेंडा लाँच केला होता. झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा कुठेही अवमान होऊ नये, अशी ताकीद कार्यकर्त्यांना दिली होती.

First published: