जळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

श्याम दीक्षित हे शनिवारी रात्री काव्य रत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री साडे बारा वाजता ते घरी गेले होते.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 11:39 AM IST

जळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

राजेश भागवत, (प्रतिनिधी)

जळगाव, 25 ऑगस्ट- शहरातील कासमवाडी परिसरात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. श्याम दीक्षित (वय-35, रा. पंचमुखी हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर, जळगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी कासमवाडी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराच्या परिसरात श्याम दीक्षितचा मृतदेह आढळून आला. सकाळी फिरायला जाणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी कळवली. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

हत्येचे कारण अस्पष्ट..

श्याम दीक्षित हा मनसेचा माजी पदाधिकारी होता. मनसेचा शहर उपाध्यक्ष म्हणून त्याने काम पाहिले होते. त्याची हत्या का झाला, या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिसांनी श्यामचा मोबाइल सापडला आहे. परंतु, मोबाइल लॉक असल्याने पोलिसांना अधिक माहिती मिळू शकली नाही. श्यामच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन, कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरू आहे. त्यावरून काही धागेदोरे मिळू शकतात, असे पोलिसांनी सांगितले. या हत्येच्या घटनेमागे काही पूर्ववैमनस्याचे कारण आहे का, या बाजूने देखील तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

Loading...

मृतदेह 3 तासांपासून घटनास्थळी पडून

श्याम दीक्षित हे शनिवारी रात्री काव्य रत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री साडे बारा वाजता ते घरी आले. त्यावेळी त्यांना मोबाइलवर एक फोन आला. नंतर ते घराबाहेर पडले. रविवारी सकाळी देविदास कॉलनीत कृपाळू साईबाबा मंदिर परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. श्याम दीक्षित हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. सरकारी पंच न मिळाल्याने श्याम दीक्षित यांचा मृतदेह तीन तासांपासून घटनास्थळी पडून होता. सकाळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

नाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2019 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...