Home /News /maharashtra /

वांझोटं निघालं सोयाबीनचं बियाणं, कृषी संचालक कार्यालयात मनसेचा तुफान राडा

वांझोटं निघालं सोयाबीनचं बियाणं, कृषी संचालक कार्यालयात मनसेचा तुफान राडा

बोगस बियाण्यांच्या विविध कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च कंपन्यांकडून वसूल करण्यात यावा.

लातूर, 14 जुलै: महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी संचालक कार्यालयात तुफान राडा करत तोडफोड केली. बोगस बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल व्हावे व शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणीही केली. हेही वाचा...खाऊ समजून खाल्लं भुईमुगाचं बियाणं; एकाचा मृत्यू तर 4 बालकांची मृत्यूशी झुंज लातूर जिल्ह्यात खरीपातील सोयाबीनचं बियाणं वांझोटं निघाल्याच्या तब्बल सहा हजार तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. सोयाबीनचं बियाणं उगलंच नसल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. मात्र, एवढ्या तक्रारी प्राप्त होऊनही लातूरच्या कृषी विभागानं मात्र काही बियाण्यांच्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून आपलं काम उरकलं. त्यामुळे अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या पेरणीचा प्रश्न कायम आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींबाबत शेतकरी संघटना आणि मनसेच्या वतीनं देखील आंदोलने करण्यात आली. मात्र, तरीही कृषी विभागाच्या कागदात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. याचाच उद्रेक म्हणून मनसे कार्यकर्त्यांकडून मंगळवारी चक्क लातूरच्या कृषी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. बोगस बियाण्यांच्या विविध कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च कंपन्यांकडून वसूल करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी कृषी कार्यालयात मनसेनं राडा केला. मनसे जिल्हाध्यक्षाने केली पालिका आयुक्तांना अश्लिल शिवीगाळ... वसई-विरार महापालिकेने लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी मनसेला डावलल्याने मंगळवारी पालिका आयुक्तांच्या कार्यलयात जावून मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राडा करून अश्लील शिवीगाळ केली. हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये धक्कादायक प्रकार! नवरदेवाला ठोकल्या बेड्या, महिला एजंट फरार वसई विरार शहर पालिकेच्या कार्यालयात आयुक्तांना भेण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्यांनी आयुक्तांनी बैठकीत ठराविकच लोकांना भेटण्यास परवानगी दिली. पालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात रुग्णांना कोणत्याही सोयीसुविधा मिळत नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी मनसेनी आयुक्तांची वेळ मागितली होती. पण केवळ दोनच लोकांनी भेटा असे सांगितल्याने आयुक्त कार्यालयाबाहेर अविनाश जाधव यांनी कोविड उपचार केंद्रातील दुरावस्थेचे फोटो त्यांच्या दलनाला चिटकवत त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Farmer, Marathwada, MNS

पुढील बातम्या