आज 'ते' नगरसेवक मांडणार आपली बाजू

आज 'ते' नगरसेवक मांडणार आपली बाजू

ही लिखित बाजू आज कोकण आयुक्तांपुढे मांडली जाणार आहे. मनसेनं या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी याचिका कोकण आयुक्तांकडे केली होती

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर: मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबईतले सर्व सहा नगरसेवक आज कोकण आयुक्तांकडे वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार आहेत. नगरसेवक फोडल्या प्रकरणात या नगरसेवकांचं काय म्हणणं आहे ते नगरसेवकांनी वकिलांना लेखी स्वरूपात दिलं आहे.

ही लिखित बाजू आज कोकण आयुक्तांपुढे मांडली जाणार आहे. मनसेनं या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी याचिका कोकण आयुक्तांकडे केली होती. ही याचिका कोकण आयुक्तांनी मान्य केली होती. याच याचिकेसंदर्भात या सहा नगरसेवकांचं काय म्हणणं आहे ते आज वकिलांमार्फत मांडणार आहेत.

दरम्यान हे नगरसेवक महानगरपालिकेच्या कुठल्याच महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे आता याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद राहते की रद्द होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.तसंच या साऱ्याचे महानगरपालिकेत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 30, 2017, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading