मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. मात्र यात्रेदरम्यान राहुल गांधी वारंवार स्वातत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनंतर आज पुन्हा एकदा अकोल्यात बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.
मनसे पदाधिकारी शेगावला जाणार
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसेचे कार्यकर्ते शेगावला जाणार आहेत. आज संध्याकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पदाधिकारी शेगावला रवाना होणार आहेत. मनसे आक्रमक झाल्यानं आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीवारीवर राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधी हे वारंवार सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आज पुन्हा एकदा अकोल्यात बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सावरकर इंग्रजांना मदत करायचे. त्यांनी इंग्रजांना पत्र लिहीलं होतं. पत्राच्या माध्यमातून त्यांनी माफीनामा सादर केला असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा अडवून दाखवा असं आव्हान त्यांनी भाजपाला केलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, MNS, Rahul gandhi, Raj Thackeray, काँग्रेस