राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार!

  • Share this:

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी विदर्भ एक्सप्रेसने विदर्भाच्या दौऱ्यावर रवाना झाले. कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रानंतर राज यांच्या दौऱ्याचा हा चवथा टप्पा आहे.

17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर असा त्यांचा दौरा आहे. अमरावती पासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार असून 26 तारखेला सिंदखेडराजा इथं त्यांचा दौरा संपणार आहे.

या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यातली मरगळ झटकणाच्या प्रयत्न करणार आहेत. विधानसभा निवडणुकीला वेळ असला तरी यावेळी मनसे तयारीत कुठलीही कमतरता राहणार नाही अशी त्यांची तयारी आहे.

राज्यात दुष्काळाचं सावट आहे. सणासुदिच्या दिवसांमध्ये लोडशेडींग होत आहे. त्यामुळं राज आपल्या दौऱ्यात सरकारवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे. त्यांची जाहीर सभा नसली तरी विविध ठिकाणी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

First published: October 16, 2018, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading