लोकसभेच्या झंझावाती सभांनंतर राज 'बॅक टू अ‍ॅक्शन'

लोकसभेच्या झंझावाती सभांनंतर राज 'बॅक टू अ‍ॅक्शन'

ठाण्यात मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे, अक्षय कुडकेलवार : लोकसभा निवडणुकीमध्ये झंझावाती सभा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा कंबर कसली आहे. ठाण्यात मनसेनं कार्यकर्ता मार्गदर्शनपर मेळाव्याचं आयोजन केलं असून राज ठाकरे या मेळाव्याला हजर राहणार आहेत. यावेळी दुष्काळाबाबत देखील चर्चा केली जाणार आहे. राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. टिपटॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत पत्रकार, पक्षातील नेत्यांचे स्वीय सहाय्यक यांना मात्र प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे दुष्काळाच्या प्रश्नावर काय मार्गदर्शन करणार, रणनिती काय आखणार याची उत्सुकता आणखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत सत्ताधारी पक्षांविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला होता. शिवाय, आक्रमक भूमिका देखील घेतली होती.

विधानसभेसाठी काँग्रेसला हवी मनसेची साथ, लोकसभेच्या निकालानंतर होणार निर्णय!

विधानसभेसाठी आखणार रणनिती

लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरेंनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे राज ठाकरे सध्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यात सध्या भयंकर दुष्काळ असून पाण्यासाठी वणवण वाढली आहे. सरकारनं केलेल्या उपाययोजना देखील कमी पडताना दिसत आहे. पाण्याची सर्व मदार ही टँकरवर आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान घेतलेल्या सभांमध्ये देखील राज ठाकरे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यामुळे आता दुष्काळाच्या प्रश्नावर राज ठाकरे काय भूमिका घेणार? नेते, कार्यकर्ते यांना काय आदेश देणार हे पाहावे लागणार आहे.

आपल्या झंझावाती सभांनंतर राज ठाकरे यांनी माझी पुढील वाटचाल लवकरच स्पष्ट करेनं असं म्हटलं होतं. त्यामुळे आता दुष्काळाच्या प्रश्नावरून राज सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार का? हे पाहावं लागणार आहे.

SPECIAL REPORT: वृद्ध आई-वडिलांमुळे लग्न जमेना, तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

First published: May 13, 2019, 9:02 AM IST

ताज्या बातम्या