मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंनी हातात घेतला ब्रश, आता फटकारे कोणावर?

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंनी हातात घेतला ब्रश, आता फटकारे कोणावर?

राज ठाकरे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत राज ठाकरे यांनी हातात ब्रश घेतल्याचं दिसत आहे.

राज ठाकरे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत राज ठाकरे यांनी हातात ब्रश घेतल्याचं दिसत आहे.

राज ठाकरे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत राज ठाकरे यांनी हातात ब्रश घेतल्याचं दिसत आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 21 जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या हिप बोनची नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. महाराष्ट्रात एकीकडे सत्तांतर घडलं, तर दुसरीकडे त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्या पक्षाचा सध्याच्या काळात एकच आमदार असला तरी राज्यातील तरुणांमध्ये राज ठाकरे यांची वेगळीच क्रेझ आहे. राज्यभरातील तरुणांच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल एक हळवी आणि आदराची जागा आहे. त्यामुळे मनसे पुन्हा जोमाने मुसंडी मारेल, अशी अनेकांची भावना आहे. राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज ठाकरे यांची तब्येत बरी होत असून शस्त्रक्रियेनंतर त्यांनी हातात पहिल्यांदाच ब्रश घेल्याची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत राज ठाकरे यांनी हातात ब्रश घेतल्याचं दिसत आहे. राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडते. त्यांनी व्यंगचित्रातून अनेकदा राज्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अनेकदा विरोधकांवर टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे व्यंगचित्रावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होते. पण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचं नवं व्यंगचित्र त्यांच्या चाहत्यांसमोर आलेलं नाही. पण आता राज ठाकरे यांनी हातात ब्रश घेतलेला फोटो समोर आल्याने लवकरच राज्याच्या राजकीय घडामोडींवर मार्मिकपणे भाष्य करणारं नवं व्यंगचित्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (मोदी-शाहंचा नवा गेम, पवारांची फिल्डिंगही फसली, महाराष्ट्रातून 16 आमदारांचं मुर्मूंना क्रॉस व्होट) दरम्यान राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी जावून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली होती. राज यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले शिवतीर्थावर दाखल झाल्या होत्या. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आशा भोसले आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांना टेनिस खेळताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढल्याने मे महिन्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर तब्येतीच्या कारणाने त्यांनी नियोजित अयोध्या दौराही रद्द केला होता.
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या