सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरे मैदानात, कोणाला करणार टार्गेट?

सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरे मैदानात, कोणाला करणार टार्गेट?

राज्यातील सत्तानाट्यानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, 10 डिसेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मनसे पक्षाची राजकीय वाटचाल, राज्यातील शेतीचे प्रश्न आणि राजकीय परिस्थिती, केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडी यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक सत्तानाट्य घडलं. या सत्तानाट्यात आधी भाजप आणि शिवसेना हे पक्ष केंद्रस्थानी होते. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून या दोन पक्षांची युती तुटल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही स्पर्धेत आले. महिनाभर चाललेलं हे सत्तानाट्य अखेर 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संपलं. मात्र या सगळ्यात राज ठाकरे यांची मनसे कुठेच दिसली नाही.

हेही वाचा - भाजप सोडण्याची चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडेंनी समर्थकांना केलं आवाहन

आता मात्र राज ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या असून आगामी काळातील रणनीती ठरवण्यासाठी आज होणार मनसेची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आहे, तर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे राज ठाकरे जनतेची प्रश्न घेऊन राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला एकाच वेळी लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'काँग्रेससारखा धर्मनिरपेक्ष पक्ष पाहिला नाही', अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एका जागेवर विजय मिळवणं शक्य झालं आहे. मात्र असं असलं तरीही एक आकडेवारी मनसेसाठी काहीशी दिलासा देणारी आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात रोमहर्षक लढतीत मनसेचे राजू पाटील हे विजयी झाले. पण त्याचवेळी महाराष्ट्रीतल 10 मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत.

मंदार हळबे (डोंबिवली), अविनाश जाधव (ठाणे), संदीप देशपांडे (दादर, माहीम), नयन कदम (मागाठाणे), संदीप जळगावकर(भांडुप प.), हर्षला चव्हाण(मुलुंड प.), किशोर शिंदे (कोथरुड), संतोष नलावडे(शिवडी)आणि शुभांगी गोवरी (भिवंडी ग्रामीण) या मनसेच्या उमेदवारांनी विजयासाठी झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Akshay Shitole
First published: December 10, 2019, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading