निकालानंतर राजकीय हालचाली सुरू असतानाच राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट?

निकालानंतर राजकीय हालचाली सुरू असतानाच राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठवडा पूर्ण झाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा गोंधळ अजूनही सुरू आहे. सत्तेतील वाटाघाटींवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकालानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. शरद पवार यांची कार्यपद्धती आपल्या आवडल्याने मी ही भेट घेतली, असं संदीप देशपांड यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेही शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची चर्चा आहे. येत्या आठवड्याभरात राज ठाकरे हे पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने वृत्त दिलं आहे.

'या' कारणासाठी घेणार भेट?

राज्याला कणखर विरोधी पक्ष देण्यासाठी मनसेला मत द्या, असं आवाहन निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी मतदारांना केलं होतं. मात्र निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला पुन्हा एकदा अपयश आला. राज्यभरातून मनसेचा अवघा एक उमेदवार निवडून आला. त्यामुळे आगामी काळात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचे असेल तर राज ठाकरे यांना विरोधात असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या भेटीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सत्ता स्थापनेतील मतभेदानंतर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. 'महाराष्ट्रात एकट्या भाजपला जनादेश मिळाला नाही. जो जनादेश मिळाला आहे तो युतीला मिळाला आहे. सत्तेचं समसमान वाटप म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्रिपदही आलंच,' असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समसमान वाटाघाटींचा सूर आवळला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.

VIDEO : मीरा-भाईंदरमध्ये तरुणांची गुंडगिरी, तलवारीनं दोघांवर जीवघेणा हल्ला

First published: October 31, 2019, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading