ठाणे, 1 मार्च : एका मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये 'कलासंगम 2020' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
'आता देशातील राजकारणीच कार्टुनसारखे दिसायला लागले आहेत. त्यामुळे व्यंगचित्र काढायला मजा येत नाही, असं व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी म्हटलं होतं. तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात आता कोणते चेहरे व्यंगचित्र काढण्यासाठी चांगले वाटतात?' असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चेहरे व्यंगचित्रासाठी चांगले असल्याचं म्हटलं आहे.
मुलाखतीत राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी
- 1988 ला शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांच्यावर एक व्यंगचित्र काढले, दुसरे घेवून गेलो तर संपादकांनी सांगितले की आता शरद पवारांवर व्यंगचित्र नको.. तो माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस होता.
- राजकारणात काही कार्टून काढण्यासारखे काही चेहरे आहेत..जसे अमित शहा, मोदी, सोनिया गांधी आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांचे चेहरे कार्टून काढण्यासारखे आहे
- महाराष्ट्रकडे बघण्याचा दृष्टीकोन हा राजकारणापलीकडचा आहे. मी देशविदेशात फिरताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते महाराष्ट्रात आणण्यासाठी माझा प्रयत्न असतो
- या सगळ्या गोष्टीसाठी निवडणूका लढवाव्या लागतात
- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स उभा करताना एक चांगली संकल्पना होती, मग त्याठिकाणी शिवाजी पार्कसारखे मैदान का उभे होवू शकले नाही?
- मी अपघाताने राजकारणात आलो मी व्यंगचित्र काढायचो, घरात राजकारण होतो तर ते आत्मसात होत होते
- माझ्या घरी येणार जाणारे राजकीय होते. माझं सर्कल तसं बनलं त्यामुळे नकळत मी राजकारणात आलो
- सध्याचे राजकीय चित्र बटबटीत झाले आहे.. कुणीही कुणाशी हातमिळवणी करतात.
- ज्यांच्या जास्त जागा आहे ते विरोधीपक्षात आले.
- राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला, वीस-पंचवीस वर्ष सत्ता असूनही शहरात काहीच कसे होत नाही?
- राजकारणात तुम्ही आपल्या मुलांना आणू शकतात स्वीकारायचे की नाही हे जनता ठरवते
- या निवडणूकीत मला आनंद झाला, निकाल लागल्यावर एक दिवस कारण पक्षांतर केलेले सगळे पडले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.