नाशिक गावाला दत्तक घेणारा बाप पळून गेला, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

नाशिक गावाला दत्तक घेणारा बाप पळून गेला, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

यावेळी संजय धोत्रे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, राधा मोहन सिंग, रावसाहेब दानवे अशा अनेक नेत्यांची शेतकरी विरोधी वक्तव्य राज यांनी वाचून दाखवली.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 24 एप्रिल : नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळीही राज ठाकरे यांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातल्या व्हिडिओ क्लिप दाखवत त्यांच्यावर घणाघात केला.

नाशिक गावाला दत्तक घेणार बाप पळून गेला अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. कांदा आणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न 8 दिवसात सोडवू अशी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ क्लिप राज ठाकरेंनी पडद्यावर दाखवली पण शेतकऱ्यांना कांदा मोफत वाटावा लागला, मुलीचं लग्न मोडलं, शेतकऱ्यांची स्वप्न उध्वस्त झाली हे गावचं सत्य असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

'या सरकारच्या काळात राज्यात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं भांडवल करून भाजपानं सत्ता मिळवली होती.' असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी संजय धोत्रे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, राधा मोहन सिंग, रावसाहेब दानवे अशा अनेक नेत्यांची शेतकरी विरोधी वक्तव्य राज यांनी वाचून दाखवली.

'इरिगेशनचे 70 हजार कोटी गेले कुठे ? खरंच झाला होता का भ्रष्टाचार ? अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई झाली का ? हा घोटाळा खरंच झाला का नुसता बनाव होता ? ' असे असंख्य प्रश्न यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केले. त्यासंदर्भात बातम्या त्यांनी पडद्यावर दाखवल्या. यावेळी नाशिकसाठी भाजपने केलेल्या घोषणा आणि गावात मनसेनं केलेली विकास कामं याचे फोटो राज ठाकरे यांनी दाखवले.

आणखी काय म्हणाले राज ठाकरे

- दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचा दावा होता

- 5 वर्षात 10 कोटी रोजगार झाले असते

- एक दिवस झटका आला आणि नोटबंदी केली

- यामुळं साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या

- कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत नोटबंदीचा पर्दाफाश केला

- ही पत्रकार परिषद कोणी दाखवली नाही

- सिब्बल खोटं बोलत असतील तर भाजप का नाही केस टाकत

- नोटबंदी आधी नोटा बदल झाला

- परदेशातून नोटा छापून आणल्या

- जात, आरक्षण, दलित, मराठा यांना नोकऱ्या देणार असं सांगणार, भांडणं लावणार

- जाती जातीत विष कालवून स्वतःचं काम करणारं गलिच्छ राजकारण करतात

- जवानांचा अभिमान, तुमचा काय संबंध ?

- पुलवामाच्या जवानांच्या नावानं मत मागतात

- एचएएल सारख्या अनेक कंपन्या डबघाईस आल्या

- 2016 मध्ये देशात 39 हजार बलात्कार झाले

- त्यानंतर सर्व आकडे सरकारनं देणं बंद करून टाकले

- RBI च्या 2 गव्हर्नरनी राजीनामा देऊन टाकला

- मोदींच्या काळात हजारो कोटी घेऊन अनेक उद्योगपती परदेशात फरार झाले

- मोदी फक्त पुलवामा, एअर स्ट्राईक यावर मतं मागताय

- अटलजींच्या अंत्ययात्रेची गर्दी, प्रचार रॅली गर्दी म्हणून दाखवतात

- नरेंद्र मोदींनी देशाला आणि मलाही मूर्ख बनवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 09:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading