महापरिनिर्वाण दिन : राज ठाकरेंसह दिग्गज नेत्यांनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिन : राज ठाकरेंसह दिग्गज नेत्यांनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचं महत्त्व अधोरेखित करत त्यांना अभिवादन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 6 डिसेंबर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी इथं जात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. 'बाबासाहेब हृदयाला भिडतात. माणूस दैवत्वाला पोहोचतो म्हणजे काय होतं याचं उदाहरण म्हणजे बाबासाहेब. त्यांना मी विनम्रतेने अभिवादन करतो,' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

लाखो शोषित-पीडितांची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. यादिवशी आंबेडकरांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीत दाखल होत आपल्या सर्वात मोठ्या नायकाला अभिवादन करतात. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचं महत्त्व अधोरेखित करत त्यांना अभिवादन केलं आहे.

'स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल,' असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या भारतीय संस्कृतीला समतेची संजीवनी देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे अखंड पुरस्कर्ते, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन,' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 10:26 AM IST

ताज्या बातम्या