राज यांचे व्यंगचित्रातून ताशेरे, म्हणाले.. लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नव्हे

राज यांचे व्यंगचित्रातून ताशेरे, म्हणाले.. लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नव्हे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून जोरदार ताशेरे ओढले आहेत.

  • Share this:

मुंबई,7 मार्च:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून शिवसेनेवर मार्मिक टीका केली आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज यांनी काढलेलं व्यंगचित्र ट्वीट केलं आहे. 'चलो अयोध्या.. अहो देश घातलात खड्ड्यात आता माझ्या नावाने गळा काढता आहात, अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नाही, हे राम!' असं राज यांनी व्यंगचित्रात म्हटलं आहे.

हेही वाचा..भाजप पदाधिकाऱ्यांने भररस्त्यावर शिवसेनेच्या नगसेवकाला केली शिवीगाळ

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (7 मार्च) अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत प्रस्तावित राम मंदिरासाठी शिवसेनेच्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची देणगी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मंदिर बांधकामात फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी ही तिसरी अयोध्या भेट असून प्रत्येक दौऱ्यानंतर आम्हाला यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेने अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपला सोडलं हिंदुत्वाला नाही असंही ते म्हणाले. यापुढेही मी अयोध्येत येत राहीन अशी घोषणाही त्यांनी केली.

हेही वाचा..धक्कादायक! पुलवामा हल्लेखोरांनी Amazonवरून मागवलं स्फोटकांचं साहित्य, NIA च्या तपासात खुलासा

केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधकामासाठी ट्रस्टची स्थापना केल्यानंतर कामाला वेग आलाय. ट्रस्टची दुसरी बैठक आज झाली त्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी कामाला सुरुवात झालीय. याचाच एक भाग म्हणून राम जन्मभूमी स्थानावर सध्या ज्या मूर्ती आहेत त्या रामलल्लांचं स्थानांतर करण्यात येणार आहे. या मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात नव्या जागेत स्थानांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.

First published: March 7, 2020, 8:13 PM IST

ताज्या बातम्या