राज ठाकरेंना धक्का? ED च्या टार्गेटवर आल्याने वाढू शकतात अडचणी

राज ठाकरेंना धक्का? ED च्या टार्गेटवर आल्याने वाढू शकतात अडचणी

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते ईडीच्या टार्गेटवर आहेत. अशातच राज ठाकरे यांचंही नाव या यादीत आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)समन्स बजावण्यात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांत ईडीकडून राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात येईल, अशा आशयाचं वृत्त 'फ्री प्रेस'ने दिलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे अडचणीत येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते ईडीच्या टार्गेटवर आहेत. अशातच राज ठाकरे यांचंही नाव या यादीत आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. 'कोहिनूर मिल 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरेंचा सहभाग असून याच कारणाने ते ईडीच्या निशाण्यावर आहेत,' असं फ्री प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

ईडी, ईव्हीएम आणि राज ठाकरे

ईडीचं संकट डोक्यावर घोंगावत असताना दुसरीकडे मात्र राज ठाकरे हे ईव्हीएमच्या मुद्द्यावर देशभर गाठीभेटी घेत आहेत. राज यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ईव्हीएमवरून राज ठाकरे हे अधिकाधिक आक्रमक होणार हे स्पष्टच आहे.

चौकशी आणि पवारांचा भाजपवर घणाघात

'सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे. या फोडाफोडीसाठी अनेक सहकारी संस्था बँका आणि इतर सरकारी यंत्रणांचाही गैरवापर भाजपकडून होत आहे,' असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तसंच याबाबत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांचंही उदाहरण दिलं होतं. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

SPECIAL REPORT: भाजपच्या तोडाफोडीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचा नवा प्लान, थोरात पवारांच्या भेटीला

Published by: Akshay Shitole
First published: August 1, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading