'मुख्यमंत्री आधी रतन खत्रीकडे कामाला होते का?' राज ठाकरेंचा सवाल

'मुख्यमंत्री आधी रतन खत्रीकडे कामाला होते का?' राज ठाकरेंचा सवाल

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दररोज नवे आकडे देतात. त्यामुळे ते रतन खत्रीकडे कामाला होते का, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

  • Share this:

02 फेब्रुवारी : काल जाहिर झालेल्या केंद्रिय अर्थसंकल्पावर 'थोडी खुशी थोडा गम' अशी प्रतिक्रिया उमटत असताना, राज ठाकरेंनीही पंतप्रधानांना टोला लगावलाय. 'गुजरातचे पंतप्रधान आपलं शेवटचं बजेट सादर करतायेत. मी मात्र माझा हिशोब करायला आज साताऱ्यात आलो आहे.', असा मिश्किल टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी साताऱ्यातल्या पदाधिकारी मेळाव्यात लगावला.

यावेळी राज यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर ठाकरी शैलीत टीका केली. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दररोज नवे आकडे देतात. त्यामुळे ते रतन खत्रीकडे कामाला होते का, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला. शेतकरी आणि कष्टकरी जनता मोठ्या अपेक्षेनं सरकारकडे पाहत असताना भाजपकडून फक्त थापा मारल्या जातायत, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

राज्यात माथी भडकवुन जातीपातीच राजकारण करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरु , निवडणुक जिंकण्यासाठी राजकारण्यांचा हा खटाटोप सुरु आहे फक्त पितळे उभारुन काहीही होणार नाही अशी टिका राज ठाकरे यांनी केली.

धर्मा पाटील हे विष पिवुन तडफडत असताना मुख्यमंत्र्यांचे स्विझर्लंडमधील बर्फ अंगावर घेतानाचे फोटो प्रसिद्ध होतायेत ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका असल्याचंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 09:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading